महाराष्ट्रातील सरकारी विभागातील भ्रष्टाचाराची आकडेवारी पहा एका क्लिकवर..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची प्रकरणे दोन टक्क्यांनी कमी झाली असून शासकीय सेवेत असलेल्या लोकसेवकाकडून होणाऱ्या भ्रष्टाचारमध्ये पुणे परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ औरंगाबाद परिक्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील चार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टचाराची सापळा कारवाई औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे.

कामानिमित्त सर्वसामान्य नागरिक जेव्हा कामानिमित्त एखाद्या शासकीय कार्यालयात जातो तेंव्हा बहुतांशवेळा लोकसेवकाकडून किंवा त्यांच्या खाजगी व्यक्तीकडून काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केली जाते असा अनुभव जवळपास सर्वानाच आला असेल. अशाच भ्रष्टाचारी कर्मचारी आणि अधिकारावर अंकुश ठेवण्याचे काम लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करते. 1 जानेवारी 2019 ते 25 डिसेंबर 2019 पर्यन्त प्राप्त आकडेवारीनुसार राज्यातिल मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,नागपूर,अमरावती, औरंगाबाद,नांदेड या आठ विभागात या काळात एकूण 850 भ्रष्टाचार प्रकरणात सापळे यशस्वी झाले आहे. या प्रकरणात 873 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.यामधील 203 प्रकरणात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. 551 प्रकरण तपासावर प्रलंबित आहेत.या मधील 33 प्रकरण अभियोग पूर्व मंजुरीसाठी प्राप्त झाले आहेत तर मंजुरीसाठी शासनाकडे 21 तर समक्ष 64 प्रकरणे प्रलंबित आहेत.

भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या कर्मचारच्या विभागाची पाहणी केली तर पोलीस विभाग पहिल्या क्रमांकावर येतो तर त्या पाठोपाठ महसूल विभागाचा नंबर लागतो व तिसरा क्रमांक पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा लागतो. चौथ्या क्रमनकावर संयुक्त रित्या मनपा आणि वीज वितरण कंपनीच लागतो तर पाचव्या क्रमांकावर शिक्षण विभाग आहे. भ्रष्टयाचार सापळा प्रकरणात गुंतलेल्या लोकसेवकां मध्ये वर्ग तिनचे कर्मचारीची संख्या सर्वाधिक असून 178 खाजगी व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांची आकडेवारी नुसार सर्वात कमी प्रकरणे 2019 मध्ये घडली.या लोकसेवकाकडून सुमारे 12 लाखाचा दंड शासनाने वसूल केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले परंतु निलंबित न केलेल्या लोकसेवकांची संख्या 194 आहे.

औरंगाबाद परिक्षेत्रातील कारवाईची आकडेवारी

सन-2018

औरंगाबाद- सापळे- 38
जालना – सापळे-27
बीड – सापळे-23
उस्मानाबाद-सापळे-30

1 जाने ते 2019 (25 डिसें.पर्यंत) कारवाई

औरंगाबाद- सापळे- 46
जालना – सापळे-28
बीड – सापळे-23
उस्मानाबाद-सापळे-26

मागील वर्षीच्या तुलनेतील टक्केवारी

औरंगाबाद- 21% जास्त
जालना – 04% जास्त
बीड – 0%
उस्मानाबाद -13% कमी

महाराष्ट्रातील भ्रष्टाचारची गुन्हे , सापळा आकडेवारी (परिक्षेत्रानुसार)

1)पुणे- 178
2)औरंगाबाद-123
3)नाशिक- 120
4)नागपूर- 110
5)अमरावती- 103
6)ठाणे- 97
7)नांदेड – 79
8)मुंबई – 40

एकूण 850 प्रकरणात पुणे पहिल्या क्रमांकावर आहेत तर औरंगाबाद परिक्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई क्रमांक सर्वात शेवटी येतो.

भ्रष्टाचाराची कारवाई झालेले टॉप – 5 विभाग

(1 जाने ते 25 डिसें 2019 पर्यंत)

1) पोलीस =191 कारवाई

2) महसूल/ भूमीअभिलेख/नोंदणी =187 कारवाई

3)जिल्हा परिषद/पंचायत समिती

4)मनपा आणि म.रा.वि.वि.क मर्यादित.

या दोन्ही विभागात प्रत्येकी= 46 कारवाई.

(दोन्ही विभाग संयुक्तिक चौथ्या क्रमांकावर)

5) शिक्षण विभाग- 29 कारवाई

वर्ग तीन मधील कर्मचारी भ्रष्टयाचारात अव्वल…

(1 जानेवारी 2019 ते 25 डिसेंम्बर 2019 पर्यंतची लाच सापळा कारवाईत गुंतलेल्या लोकसेवकांची/खाजगी व्यक्तींची आकडेवारी)

वर्ग एक अधिकारी – 57
वर्ग दोन- 91
वर्ग तीन – 697
वर्ग चार – 51
इ.लो.से.- 79
खाजगी व्यक्ती -178

महाराष्ट्रातील सरकारी नोकरी मधील लाचेच्या सापळा कारवाईत गुंतलेल्या लोकसेवकामध्ये वर्ग तीनचे सर्वात जास्त कर्मचारी आहेत. या मध्ये खाजगी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने सरकारी कामात या खाजगी व्यक्तींचा किती हस्तक्षेप आहे हे या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई वरून स्पष्ठ होते. लोकसेवकावर अंकुश ठेवायचे असेल तर या खाजगी व्यक्तींना आवर घालणे देखील भ्रष्टाचारावर एक मोठा उपाय होऊ शकतो.

सन-2011 ते सन-2019 पर्यन्तची वर्षनिहाय भ्रष्टचाराची माहिती..
2011

सापळा- 437
अपसंपदा-10
अन्य भ्रष्टाचार-16
एकूण गुन्हे -463

2012

सापळा- 489
अपसंपदा-22
अन्य भ्रष्टाचार-13
एकूण गुन्हे -524

2013
सापळा- 583
अपसंपदा-16
अन्य भ्रष्टाचार-05
एकूण गुन्हे -604

2014
सापळा- 1245
अपसंपदा-48
अन्य भ्रष्टाचार-23
एकूण गुन्हे -1316

2015
सापळा- 1234
अपसंपदा-35
अन्य भ्रष्टाचार-10
एकूण गुन्हे -1279

2016
सापळा- 985
अपसंपदा-17
अन्य भ्रष्टाचार-14
एकूण गुन्हे -1016

2017
सापळा- 875
अपसंपदा-22
अन्य भ्रष्टाचार-28
एकूण गुन्हे -925

2018
सापळा- 891
अपसंपदा-22
अन्य भ्रष्टाचार-23
एकूण गुन्हे -936

2019
(1जाने ते 25 डिसें पर्यंत)

सापळा- 850
अपसंपदा-18
अन्य भ्रष्टाचार-05
एकूण गुन्हे -873

वरील सर्व आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत सन 2019 मध्ये कमी प्रमाणात भ्रष्टाचार प्रकरणे घडली असे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे.

Leave a Comment