LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक दरमहा मिळवा 1000 रुपयांची पेन्शन !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC कडे ग्राहकांना फायदे मिळवून देणाऱ्या अनेक पॉलिसी आहेत. LIC New Jeevan Shanti Plan ही त्यांपैकीच एक योजना आहे. निवृत्तीनंतर खर्चाची काळजी वाटत असणाऱ्यांना ही योजना जास्त फायदेशीर ठरेल. पॉलिसीधारकांना आता या योजनेअंतर्गत जास्त अ‍ॅन्युइटी मिळणार आहे. मात्र ज्या पॉलिसीधारकांनी 5 जानेवारी किंवा त्यानंतर प्लॅन घेतला आहे त्यांना याचा फायदा मिळणार आहे. ही एक सिंगल प्रीमियम अ‍ॅन्युइटी योजना आहे ज्यामध्ये पॉलिसीधारकाला तात्काळ अ‍ॅन्युइटी किंवा डिफर्ड अ‍ॅन्युइटी निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

LIC Jeevan Shanti Plan : सेवानिवृत्ति के बाद प्रतिमाह मिलेंगे 12,000 रूपए

एलआयसीने याबाबत माहिती देताना म्हंटले की,” या प्लॅनच्या खरेदी किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. ज्यामध्ये आता पॉलिसीधारकांना 1,000 रुपयांच्या खरेदी किंमतीत 3 ते 9.75 रुपयांचे इंसेंटिव्ह मिळू शकेल. मात्र हे इंसेंटिव्ह प्लॅनच्या खरेदीची किंमत आणि निवडलेल्या स्थगित कालावधीवर आधारित असेल. ग्राहकांना हा प्लॅन ऑफलाइन तसेच ऑनलाइनही खरेदी करता येईल. ही एक सर्वसमावेशक अ‍ॅन्युइटी योजना आहे ज्याचा फायदा पॉलिसीधारकासोबतच त्याच्या कुटुंबाला देखील होईल.

Get Rs 14000 per month by giving only 1 installment, know the complete plan if LIC

1000 रुपये/महिना पेन्शन उपलब्ध

या योजनेची किमान खरेदी किंमत 1.5 लाख रुपये आहे. म्हणजेच यासाठी किमान 1.5 लाख रुपये गुंतवावे लागतील. त्याच वेळी, जास्तीच्या गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. तसेच यामध्ये आपल्या गरजेनुसार वार्षिक, 6 महिने, 3 महिने किंवा मासिक आधारावर पेन्शन मिळू शकेल. यामध्ये जर 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मासिक 1,000 रुपये आणि वार्षिक आधारावर 12,000 रुपये पेन्शन मिळेल.

LIC's New Jeevan Shanti Plan 2023: LIC modifies annuity payouts for policyholders - BusinessToday

 LIC New Jeevan Shanti Plan ची वैशिष्ट्ये जाणून घ्या …

– कर्जाची सुविधा उपलब्ध
– 3 महिन्यांनंतर केव्हाही सरेंडर करता येते (कोणत्याही वैद्यकीय कागदपत्रांशिवाय)
– पेन्शन लगेच किंवा 1 ते 20 वर्षांच्या दरम्यान कधीही सुरू होते
– याशिवाय जॉइंट लाइफ ऑप्शनमध्ये कोणत्याही जवळच्या नातेवाईकाचा समावेश करता येऊ शकतो.

LIC Jeevan Shiromani Plan Invest For 4 Years To Get 1 Crore Fund Know Details | LIC Jeevan Shiromani Plan: 4 साल के छोटे निवेश में पाएं 1 करोड़ का मोटा फंड!

‘या’ वयातील लोकांना मिळेल लाभ

एलआयसीच्या या योजनेमध्ये कमीत कमी 30 वर्षे आणि जास्तीत जास्त 79 वर्षे वयाच्या सहभागी होता येते. तसेच यामध्ये पेन्शन सुरू झाल्यापासूनच्या 1 वर्षानंतर कर्ज देखील घेता येते. त्याच प्रमाणे पेन्शन सुरू झाल्यापासून 3 महिन्यांनंतर ते सरेंडर करता येते. तात्काळ आणि स्थगित ऍन्युइटी पर्यायांसाठी पॉलिसी घेताना हमी वार्षिक दर दिले जातील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-New-Jeevan-Shanti-(Plan-No-858)-(UIN-512N338

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये