चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे ‘अशा’ प्रकारे मिळवा परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शन सुरू झाल्यामुळे आता बँकेशी संबंधित सर्व कामे घरबसल्या केली जातात. आता पैसे जमा करायचे असो की दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवायचे असो, मोबाईल किंवा लॅपटॉपवर आपण हे काम क्षणात करतो. नेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. आपण डिजिटल वॉलेट, UPI, Google Pay किंवा BHIM App वापरून घरबसल्या तुम्ही कोणाच्याही बँक खात्यात ऑनलाइन पैसे पाठवू शकता.

खर्‍या अर्थाने ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन अतिशय सोपे आणि सोयीस्कर आहे. मात्र अनेक वेळा आपल्याकडून मोठ्या चुका होतात. अनेकदा अशी प्रकरणे असतात जेव्हा तुम्ही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता. कधी कधी चुकीचा बँक खाते क्रमांक टाइप केल्याने पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात. अशा वेळी ते पैसे परत कसे मिळवायचे असा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. आज आम्ही आपणास चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत कसे मिळवायचे ? हे सांगणार आहोत.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत, तर लगेच तुमच्या बँकेला याबाबत कळवा. बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करा आणि कळवा की तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत. ज्या ट्रान्सझॅक्शन द्वारे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत त्याचे डिटेल्स जसे की खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, वेळ, तारीख इत्यादी तुमच्या बँकेला कळवा.

तसेच तुमच्या बँकेच्या शाखेत चुकीच्या ट्रान्सझॅक्शनसाठी लेखी अर्ज सबमिट करा. यासोबतच तुम्ही त्या बँकेतही जा, ज्यांच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. या ट्रान्सझॅक्शनची संपूर्ण माहिती त्या बँकेच्या शाखेलाही द्या. लक्षात ठेवा की, हे काम जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बँक पैसे काढण्याची कारवाई करेल. जर तुमच्या स्वतःच्या बँकेच्या इतर कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले असतील तर तुम्ही अर्ज लिहून पैसे परत मागू शकता.

Leave a Comment