कराड | मलकापूर नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 मध्ये पश्चिम भारतात 146 वा क्रमांक, स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 देशामध्ये 66, स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 देशामध्ये 25 वा पश्चिम भारतामध्ये 11 वा व महाराष्ट्रात 10 वा क्रमांक प्राप्त केला आहे. मलकापूर नगरपरिषदेने नेहमीच लोकसहाभागाच्या माध्यमातून सर्व योजना वउपक्रम यशस्वी केल्या आहेत. तसेच मलकापूर नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 मध्ये हागणदारी मुक्त शहर अंतर्गत ODF++ व कचरामुक्त शहराकरिता 3 स्टार मानांकन प्राप्त झाल्याची माहिती मलकापूर नगरपरिषदेचे उपनराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत केंद्र शासनाचे गृहनिर्माण तथा शहरी कार्यमंत्रालय यांचे स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि GFC तारांकित मानांकन शहर याबाबतचे दि. 20 नाव्हेंबर 2021 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती, गृहनिर्माण तथा शहरी कार्यमंत्रालय मंत्री यांचे हस्ते पुरस्कार घोषित करून वितरण करण्यात येणार आहे.
गृहनिर्माण तथा शहरी कार्यमंत्रालय, भारत सरकार व नगरविकास विभाग महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय यांकडून दि. 11/11/2021 रोजी प्राप्त झालेल्या पत्रान्वये मलकापूर नगरपरिषदेस GFC तारांकित मानांकन प्राप्त झाले असून, सदरचा पुरस्कार स्विकारणेकरिता आमंत्रित करून गौरविणेत येणार आहे.




