Ghanchakkar Peak : पर्यटकांना चक्रावणारे शिखर घनचक्कर; जोखमीची पायवाट देईल चित्तथरारक अनुभव

Ghanchakkar Peak
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghanchakkar Peak) महाराष्ट्रात अनेक गड किल्ले सर करण्यासारखे आहेत. जे ट्रेकर्स आणि पर्यटकांना कायम आकर्षून घेतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगा या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर अनुभव देणाऱ्या पर्वत रांगा आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते. ज्याची उंची ही १६४६ मीटर इतकी आहे. तर, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले घनचक्कर हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. ज्याची चढाई करणे खाऊचे काम नाही. अशा या शिखरांविषयी अधिक माहिती घेऊया.

शिखर घनचक्कर (Ghanchakkar Peak)

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले शिखर घनचक्कर हे शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा ते खिंडीपासून घनचक्करचा माथा असे आहे. त्यामुळे इथून पुन्हा शिरपुंजे गावात पोहचण्यासाठी जवळपास ५ तास पायपीट करावी लागते. एकूणच हे अंतर ८ किलोमीटर इतके आहे. दरम्यान, घनचक्कर शिखर हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वोच्च शिखर असून या शिखरावर चढाई करण्यासाठी ट्रेकर्स कायम उत्सुक असतात. या शिखराची पायवाट अत्यंत जोखीमीची असल्याने हे शिखर सर करतेवेळी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटकांपेक्षा जास्त इथे ट्रेकर्स पहायला मिळतात.

जोखमीची पायवाट

घनचक्कर शिखराची पायवाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. (Ghanchakkar Peak) या खिंडीत केवळ एक पाऊल बसेल इतकीच जागा असून एका बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे घनचक्कर शिखर सर करण्याचा अनुभव हा चित्तथरारक आहे. असा हा अनुभव जितका थरारक तितकाच नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी किमान एकदा तरी हे शिखर जरूर सर करावे.

महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर गावलदेव हे उंच शिखर मानले जाते. मुख्य म्हणजे हे शिखर घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. (Ghanchakkar Peak) तर घनचक्कर हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरांपैकी क्रमांक तीनचे शिखर आहे. घनचक्कर या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे १५०९ मीटर उंच इतकी आहे.