हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghee Roti Benefits) लहानपणी तुम्ही गरमागरम पोळी आणि त्यावर तूप साखर लावून खाल्ले असेल. आजही कितीतरी लहान मुलांच्या डब्यात अशी तुपाची पोळी पहायला मिळते. तुपाने चपातीची न केवळ चव तर पौष्टिकतासुद्धा वाढते, असं जाणकार मंडळी सांगतात. पण आजच्या लोकांची जीवनशैली पाहता खाण्यापिण्याबाबत सतर्क असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या आहारात तूप आणि तेलाचे प्रमाण सीमित असावे यासाठी प्रत्येकाची एक वेगळी धडपड सुरु असते.
बरेच लोक कोलेस्ट्रॉल वाढेल या भितीने जेवणात तेला- तुपाचे प्रमाण फार कमी ठेवतात. कारण कोलेस्ट्रॉल वाढलं की त्यासोबत येणारा लठ्ठपणा कमी होण्याचं नाव घेत नाही. (Ghee Roti Benefits) शिवाय कोलेस्टरॉलमुळे हृदयाचे आरोग्यदेखील धोक्यात येते. मग अशावेळी आपल्या आहारात तुपाचा समावेश करणे योग्य की अयोग्य? असा प्रश्न पडतो. जर तुम्ही नियमित तूप लावलेली चपाती खात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी. आम्ही तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यातून देत आहोत.
चपातीला तूप लावून खाणे कितपत योग्य?
कित्येक घरांमध्ये चपातीला तूप लावले जाते. तुपाशिवाय चपाती कित्येकांच्या घशाखाली उतरत नाही. अशा लोकांना आरोग्य तज्ञ सांगतात की, जर तुम्हाला तूप लावलेली पोळी खाणे आवडत असेल तर यात काहीही चूक नाही. मात्र, पोळीला तूप लावतेवेळी त्याचे प्रमाण सीमित असेल तरच तुम्हाला तुपाचे योग्य ते आरोग्यदायी लाभ मिळतील. (Ghee Roti Benefits)
इतकेच नव्हे तर नियमित तूप खाल्ल्याने तब्येतही चांगली राहील. शिवाय सकाळी सकाळी तूप लावलेली चपाती खाल्लीत तर दिवसभर तुमचं पोट भरल्यासारखं राहील आणि यामुळे तुम्हाला फार भूक लागणार नाही. पण एक गोष्ट महत्वाची अशी की, अति प्रमाणात तुपाचे सेवन करून चालणार नाही’. तूप खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेसुद्धा आहेत. हे दोन्ही आपण जाणून घेऊ.
तूप खाण्याचे फायदे (Ghee Roti Benefits)
तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि त्यामुळे तुमचा दिवस एनर्जेटिक जातो. याशिवाय तुपामध्ये आपल्या त्वचेला मुलायम बनवण्याचे सामर्थ्य असते. इतकेच नव्हे तर तुपातील कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी चांगले असते. यामुळे हाडे ठिसूळ होत नाहीत. तसेच तुपात ओमेगा- ३ फॅटी ॲसिडदेखील चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढवते.
तूप खाण्याचे तोटे
प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीराला चांगले फायदे मिळतात. पण त्याच तुपाचे प्रमाण जास्त झाले तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकते. परिणामी हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. (Ghee Roti Benefits) याशिवाय वजन वाढू शकते. तसेच काही लोकांना अपचन, गॅस किंवा पोटाच्या इतर समस्यादेखील जाणवू शकतात.