बेपत्ता महिलेचा शोध घेत असताना दिसला महाकाय अजगर; पोट फाडून बघताच बसला धक्का

0
237
python eats woman indonesia
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडोनेशियामध्ये 22 फूट लांबीच्या अजगराने 54 वर्षीय महिलेला संपूर्ण गिळल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेत असताना पोट फुगलेला महाकाय अजगर आढळून आला. त्याचे पोट फाडल्यानांतर आतमध्ये महिलेचा मृतदेह दिसला, यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जाहराह (५४) नावाची ही महिला रविवारी सकाळी सुमात्रा बेटावरील जांबी प्रांतात मळ्यात काम करण्यासाठी गेली होती परंतु संध्याकाळी घरी न परतल्याने तिच्या पतीने ती गायब असल्याची तक्रार नोंदवली. तिच्या पतीने तिचा शोध घेत असताना तिचा सँडल, हेडस्कार्फ, जाकीट आणि तिने कामात वापरलेली साहित्य शोधून काढली, यावेळी त्यांना त्याठिकाणी एक पोट फुगलेले 7 मीटर लांब अजगर दिसले. या अजगराने महिलेला गिळल्याचा संशय आला.

स्थानिकांनी या अजगराला ठार मारुन त्याचे पोट कापून पाहिलं असता आतमध्ये महिलेचा मृतदेह सापडला. पोलीस प्रमुखांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेने इंडोनेशियात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही 2018 मध्ये, सुलावेसीपासून दूर असलेल्या मुना बेटावर एका महिलेला एका महाकाय अजगराने गिळल्याचे आढळून आले होते.