औरंगाबाद | कोणतीही परवानगी न देता मनपा आयुक्तच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन अनधिकृतपणे कापले याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी 28 जुलै रोजी सकाळी मनसेच्या सहा पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माने यांनी दिली आहे.
मनसेचे जिल्हा संघटक बिपिन शंकर सिंग नाईक (37, विराज नगर गादिया विहार गारखेडा) वैभव मंगल अप्पा मिटकर (35, रा. आदर्श कॉलनी गारखेडा परिसर)माजी जिल्हाध्यक्ष संकेत बाळासाहेब शेटे (32 रा. छत्रपती नगर गारखेडा परिसर) उप शहराध्यक्ष राहुल दत्तात्रय पाटील(30 रा. ज्ञानेश्वर नगर एन टु हडको) जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत प्रभाकर दहिवडकर (50 रा. वसंतविहार झांबड इस्टेट) वाहतूक जिल्हाध्यक्ष संघटक मनीष जोगदंडे ( 37 रा. भगीरथ नगर रेल्वे स्टेशन) अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
शहरवासीयांना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वरील सहा जणांनी कोणतीही परवानगी न घेता. अवैधरित्या 18 जुलै रोजी पहाटे मनपा आयुक्त असते कुमार पांडे यांच्या बंगल्याच्या नळ कनेक्शन कापले. या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अशोक पाद्दे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.