संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ हि म्हण पुण्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकाराला लागू पडते. पुण्यात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या रागाचे देखील कित्येक प्रकार आहेत. अशाच एका पुणेकरांच्या रागाचा रंग आज पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पाहण्यास मिळाला. कर्वेनगर येथे पश्चिमानगरी सोसायटीमध्ये एक मुलगा आणि मुलगी जेवणाचा डबा खाण्यास बाकावर बसले असता एक वृद्ध पुणेकर तिथे आला आणि त्याने तरुणासोबत शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्यानंतर त्या वृद्धाने थेट त्या तरुण तरुणीला काठीने मारहाण केली आहे.

संजय मोहेकर ( वय ६२) असे त्या काठीने मारहाण करणाऱ्या आरोपी इसमाचे नाव आहे. कर्वेनगर पश्चिमानगरी सोसायटीमध्ये ‘१० सी’ इमारतीच्या नजीक असणाऱ्या बाकाजवळ एक तरुण आणि तरुणी डबा खात बसले असता. संजय मोहेकर हा  इसम तेथे आला. तुम्ही इथे डबा खात बसू शकत नाही असे त्याने त्या तरुण तरुणीला खडसावून सांगितले. त्यानंतर तरुण म्हणला कि काका मी आजारी आहे. मी इथं डॉक्टरकडे आलो होतो. मी याच सोसायटीच्या ‘२४ इ’ इमारतीत राहतो. मी डबा खाऊन झाला कि जातो. अशी विनंती करून देखील त्या व्यक्तीने ऐकले नाही. तरी देखील आरोपी इसम ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. अशातच तो पीडित तरुण त्या व्यक्तीला म्हणाला कि काका तुम्हाला माझ्या सारख्या आजारी व्यक्तीला असे जेवणाच्या ताटावरून उठवून लावायला काहीच कसे वाटत नाही. असे म्हणताच त्या व्यक्तीचा रागाचा पारा चढला आणि त्याने आजारी असणाऱ्या तरुणाला मारण्यास सुरुवात केली. तरुणाला मारहाण करताना त्याच्या सोबत असणारी तरुणी मधे आली असता त्या व्यक्तीने त्या तरुणीला देखील मारहाण केली. दोघांना मारहाण करून आरोपी इसम पश्चिमानगरी सोसायटीमधील ‘१० सी’ इमारतीमध्ये स्वतःच्या फ्लॅट नंबर ३ मध्ये निघून गेला.

पीडित तरुण तरुणीने १०० नंबरवर फोन करून सदरची घटना पोलिसांना सांगितली असता. पेट्रोलिंगवर असणारे दोन पोलीस घटना स्थळी दाखल झाले. ते पोलीस चौकशीसाठी त्या व्यक्तीच्या घरी केले असता दाराला कुलूप लावून तो व्यक्ती पसार झाला होता. त्यानंतर पीडित तरुण तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात सदर घटनेची रीतसर तक्रार नोंद केली. घटना स्थळी उपस्थित असणाऱ्या ६ व्यक्तींनी या घटनेची साक्ष दिली असून पोलीस हवालदार पी. व्ही. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment