इंस्टाग्रामवर ओळख करुन तिच्यासोबत बनवले शारिरीक संबंध, आता करतोय ब्लॅकमेल

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

सांगली प्रतिनिधी | इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा फायदा उठवत अहमदनगर येथील एका तरुणाने सांगलीतील तरुणीशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना आज उघडकीस आली. पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात अविनाश संजय पवार याच्या विरोधात तक्रार दिली आहे. तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्या शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले असल्याचेही तक्रारीत म्हंटलेले आहे. तरुणीच्या तक्रारीवरून अविनाश पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची अहमदनगर येथील आज्या उर्फ अविनाश संजय पवार याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. इंस्टाग्रामवर त्याने माझे नाव अजय पवार असून मी बिझनेस करतो असे सांगितले होते. त्यातून दोघांची ओळख वाढली. त्याने त्या पीडित मुलीला एकेठिकाणी बोलावून तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे अमिश दाखवून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ती अर्धवट शुद्धीत असताना तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. हे करत असताना त्याने त्याचे मोबाईलवरून चित्रीकरण केले असून फोटो हि काढले आहेत. तुझी व्हिडिओक्लिप सोशल मीडियावरून व्हायरल करतो अशी धमकी देऊन लॉजवर नेऊन पुन्हा एकदा जबरदस्ती केली. तुझ्या वडिलांच्या व्हाट्सअँपवर फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी तरुण वारंवार देत आहे.

तसेच त्याच्या इन्स्टाग्राम या अकाउंटवरून त्याने तयार केलेल्या लिंक युट्यूबवरून अश्लील फोटो आणि व्हिडिओ शेअर करून बदनामी केल्याचे संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याघटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसानी आज्या उर्फ अविनाश संजय पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना १५ जुन २०१८ ते ४ मे २०१९ या कालावधीत घड्ली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com