तीन मुली झाल्याने नाराज बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – आजसुद्धा देशभरात अनेक ठिकाणी मुली जन्मल्यानंतर घरात नाराजी व्यक्त केली जाते. यातून अनेकजण गंभीर गुन्हे करत असतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीला जीवे मारले आहे. त्याला एकापाठोपाठ तीन मुली झाल्याने या व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले आहे. यादरम्यान विहिरीत बुडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

हि घटना मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. या घटनेत पत्नीसह 3 महिन्याच्या मुलीचा जीव वाचला आहे. डढिया गावातील राजा भैया यादव आपली पत्नी बिट्टी आणि दोन मुलींना दुचाकीवरुन घेऊन चालला होता. तेव्हा त्याने पडोई गावाजवळ रस्त्यापासून थोडं दूर एक निर्मनुष्य जागा पाहून त्याने गाडी थांबवून आपल्या पत्नीला व दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिले आहे. यामध्ये पाण्यात बुडून एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

या व्यक्तीच्या पत्नीने तीन महिन्याच्या मुलीला वाचवले आहे. यानंतर तिने रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांची मदत घेत पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले कि जावई त्यांच्या मुलीला याआधीही अनेकदा मारहाण करत होता. यानंतर त्याने हे कृत्य केले आहे. एकापाठोपाठ तिन्ही मुली झाल्याने तिचा पती तिला सतत मारहाण करत होता. तसेच अनेकदा तो तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देत असे. आरोपी राजा भैया विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment