Friday, June 2, 2023

Shocking : युवतीचा Electric Bike चार्जिंगला लावताना शाॅक लागून मृत्यू

कराड | इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगला लावताना शॉक लागून युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कराड तालुक्यातील म्होप्रे येथे ही घटना घडली. शिवानी अनिल पाटील (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात शिवानीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील शिवानी पाटील ही युवती इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करीत होती. शुक्रवारी बाहेरगावी जाणार असल्यामुळे दुचाकीची बॅटरीचे चार्जिंग तपासले. चार्जिंग कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवानीने दुचाकीची बॅटरी काढली. ती चार्जला लावण्यासाठी ती घरामध्ये गेली.

मात्र, बॅटरी चार्जला लावत असताना अचानक शिवानीला शॉक लागला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी कराडला रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.