Saturday, January 28, 2023

तडफडणाऱ्या आईला मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन! पण वाचवू शकली नाही प्राण; विडिओ होतोय प्रचंड व्हायरल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर प्रदेशामध्ये सध्या करोणाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. आणि ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी होत आहे. यामुळे पेशंटचे हाल होताना दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशातील एका जिल्हा रुग्णालयांमधील एक व्हिडिओ सोशल माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता उद्भवल्याने एका गंभीर अवस्थेतील महिलेला श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. ती महिला ऑक्सिजन अभावी तडफडू लागली. आपल्या आईचे हाल न बघवल्याने तिच्या बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मुलीने आईला तोंडाने ऑक्सिजन देत राहिली. परंतु, तिच्या प्रयत्नांना यश आले नाही.

या व्हिडिओमधील महिलेला रुग्णालयातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऑक्सिजन मिळत नव्हता. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. तो त्रास महिलेच्या मुलीला पहवला नाही अशा वेळी तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून आईला तोंडाने ऑक्सिजन देण्यास सुरुवात केली. परंतु, आईची तब्येत अजूनच जास्त बिघडल्याने आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने महिलेचा जीव गेला.

- Advertisement -

 

संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी एक महिला आपल्या पतीला ऑटोमधून घेऊन जात असताना आपल्या तोंडाने पतीला ऑक्सिजन देत असतानाचा विडियोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळीही ती महिला आपल्या पतीचा जीव वाचू शकली नाही.