सांगली : हॅलो महाराष्ट्र – आताच्या घडीला प्रेम विवाह हि क्षुल्लक गोष्ट मानली जात आहे. मात्र आजही आपल्या समाजात प्रेमविवाह केला म्हणजे घराण्याची अब्रू वेशीला टांगली, असे भूरसटलेले विचार असणारी माणसे आहेत. हे चित्त थरारक सत्य सैराट या मराठी चित्रपटातून हुबेहूब मांडण्यात आले आहे. अशाच प्रकारची एक घटना सांगतीमध्ये घडली आहे.
काय आहे प्रकरण ?
सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये एका तरुणावर प्रेम विवाह केला म्हणून त्याच्या सासरच्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. या घटनेतील पीडित तरुणाचे नाव योगेश लवाटे असे आहे. या तरुणाने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. या पीडित तरुणाचे त्याच्या पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पण मुलीच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्रेमविवाह केला होता.
यामुळे मुलीच्या कुटुबियांना राग आला होता. त्यांना मुलीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटत होती. यामुळे त्यांनी या घटनेचा सुड घेण्याचे ठरवले. या दरम्यान दोन दिवसांपूर्वी योगेश लवाटे आणि मुलीचे आई-वडील यांच्यात मोठे भांडण झाले होते. हे भांडण एवढे मोठे झाले कि मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर योगेश लवाटे हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास घरी निधाला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मिरज शहरसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.