खळबळजनक! आधी फेसबुकवर केली मैत्री, जवळीक वाढवत तरुणीवर केला अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । फेसबुकवर ओळख केली आणि ओळख झाल्यानंतर बजाजनगर परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या रोहन खाजेकर (रा. रामनगर औरंगाबाद) या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. बजाजनगर परिसरातील 25 वर्षीय तरुणी साडेचार वर्षांपासून मुंबईतील भांडुप येथे लहान मुले सांभाळण्याचे काम करते. दोन वर्षांपूर्वी मुंबईत असताना पीडित तरुणीची आरोपी रोहनशी फेसबुक वरून ओळख झाली होती.

जून 2019 मध्ये रोहन हा मैत्रिणीला भेटण्यासाठी मुंबईत गेला होता. रोहनने तिला लग्नाची मागणी घातली. तरुणीने रोहनला तिच्या आई वडिलांना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर रोहनच्या आई देखील पीडितेशी संपर्क साधून पैसे जमा करण्यास सांगितले. लग्न होणार असल्यामुळे त्या तरुणीने 2019 पासून रोहनच्या बँक खात्यावर प्रतिमाहीना दहा, ते बारा हजार रुपये पाठवण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये 15 एप्रिल रोजी औरंगाबाद ला कोर्टात लग्न करण्याचा निर्णय झाला.

19 मार्च ला रोहनने नियोजित वधूशी संपर्क साधून तिचा विरोध झुकारून शारीरिक संबंध केले. शारीरिक संबंध ठेऊन दिल्याने मी तुझ्याशी लग्न करणार नाही. असे म्हणून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Comment