औरंगाबाद – मागील महिन्यात अबॅकसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत औरंगाबादची श्रावणी साळवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मृण्मयी चोटमल, संचिता फरकडे, वेदांत निकम, श्रावणी साळवे, तेजस्विनी काळे, संजना सोळुंके, वैष्णवी सोळुंके, प्रिया चिकटे, ऋग्वेद नारखेड़े, अभिजीत शेळके, भक्ती साळवे, वेदांत राठोड, ऋषिकेश खर्चे, संस्कृती सोळुंके या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
औरंगाबाद येथील रेनबो अबॅकस हर्सूल सेंटर येथे नुकताच या अबॅकस स्पर्धेच्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात राष्ट्रीय स्पर्धेतील विजेती श्रावणी दशरथ साळवे व राज्य स्पर्धेतील विजेत्या सर्व विद्यार्थींनींचा स्मृतीचिन्ह व मेडल्स देऊन गौरव करण्यात आला. या व्यतिरिक्त बेंचमार्क प्राप्त करणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांनाही स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी रेनबो अबॅकसच्या केंद्र संचालिका स्मिता पाथ्रीकर यांच्या कार्याचाही गौरव केला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाग्यश्री औताडे यांची उपस्थिती होती. अधिकाधिक विद्यर्थ्यांनी रेनबो केंद्रात प्रवेश घेऊन सिप अबॅकस कार्यक्रमाचा पालक आणि केंद्राचे विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. स्मिता पाथ्रीकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल पाथ्रीकर यांनी केले.