मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटला!! जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुप्रीम कोर्टाची मंजूरी

Jayakwadi Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज अखेर मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर तोडगा निघाला आहे. कारण की, इथून पुढे उत्तर महाराष्ट्रच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रातील विविध धरणातून सोडले जाईल. त्यामुळे आता मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होणार आहे. मुख्य म्हणजे, जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात पार पडलेल्या … Read more

धक्कादायक ! पत्नीचा गळा दाबून शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत रंगनाथ … Read more

खळबळजनक ! पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी

परभणी प्रतिनिधी |  महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने एसटी महामंडळाकडून मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनावर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या सारखे विचार येत असल्याचे म्हणत इच्छामरणाची परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी … Read more

वैद्यनाथ मंदिरानंतर आता ‘या’ मंदिराला आरडीएक्सने उडवण्याच्या धमकीने खळबळ

parli

बीड – परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे … Read more

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुलींचा डंका

Abacus

औरंगाबाद – मागील महिन्यात अबॅकसच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत औरंगाबादची श्रावणी साळवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मृण्मयी चोटमल, संचिता फरकडे, वेदांत निकम, श्रावणी साळवे, तेजस्विनी काळे, संजना सोळुंके, वैष्णवी सोळुंके, प्रिया चिकटे, ऋग्वेद नारखेड़े, अभिजीत शेळके, भक्ती साळवे, वेदांत राठोड, ऋषिकेश खर्चे, संस्कृती सोळुंके या विद्यार्थ्यांनी … Read more

जमिनीतून गुढ आवाज येत असल्याने हिंगोली जिल्ह्यातील नागरीक भयभीत

हिंगोली |  वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावासह व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातून रविवारी सकाळी 7.15 व त्यानंतर 08:19 या वेळेत दोनदा आवाज आले आहेत. या आवाजामुळे पूर्ण जमीन हादरून सौम्य धक्का जाणवला आहे. वसमत तालुक्यातील अनेक वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येत आहे. काही वर्षापूर्वी हे आवाज वर्ष, दोन वर्षानंतर येत होते. त्यानंतर हे आवाज … Read more

पुरामुळे दवाखान्यात जाता न आल्याने गर्भातच दगावले बाळ

child death

परभणी |  जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे उपचारासाठी शहरातील रुग्णालयात जाऊ न शकल्याने एका गर्भवती महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून तालुक्‍यातील सर्वच नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. या पावसामुळे अनेक रस्ते वाहून … Read more

पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीनेही सोडला जीव

death

लातूर | 47 वर्षापासून संसारात साथ देणाऱ्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी निधन झाले. हे कळताच दुःख सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीनेही प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना (उस्तुरी ता.निलंगा) येथे घडली आहे. पती-पत्नीचा एकाच दिवशी मृत्यू झाला आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ मुलांवर आली यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटरमध्ये अपुरा औषध साठा, रूग्णांना बाहेरून आणावी लागत आहेत औषधे; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद | चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या कोवीड केअर सेंटरमध्ये औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत असल्याने तात्काळ या सेंटरवर औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढताच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत आली होती. शहरातील अनेक रुग्णालयांना या … Read more