कौतुकास्पद! मुलींनीच दीला आईला खांदा, तेरवी न करता मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती च्या शिरजगाव येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांच्या पत्नी विमलताई वानखडे यांचे काल  अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन असतांना नियमांचे पालन करून त्यांच्या चार मुलींनी आईला खांदा देऊन परतवाडा येथील मोक्षधामात चिताग्नी दिला. यावेळी तेरावी न करता ते पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

विमलताई वानखडे यांची नुकतीच दोन महिन्यापूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर वार्धक्यामुळे त्या त्यांचे मुलीकडे परतवाडा येथे मुक्कामी होत्या. सध्या सर्वत्र कोरोना आजाराचे सावट असल्याने निधनानंतर सर्व नातलगांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार अंत्यसंस्काराला अधिक गर्दी न करता विमलताई वानखडे यांच्या चार ही मुलींनी खांदा देण्याचा निर्धार केला. यावेळी अगदी जवळच्या नातलगांच्या उपस्थितीत मुलींनी मोक्षधामात चिताग्नी दिला. शिवाय सद्याची परिस्थिती बघता कुठलाही तेरवी सारखा कार्यक्रम न ठेवता चार ही मुलींनी मुख्यमंत्री सहायता निधी सह सामाजिक संस्थांना दान देण्याचा निर्धार केला.

नारायणराव वानखडे यांनी पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुणवंत महाराज संस्थान लाखनवाडी येथे एक लक्ष रुपये, तसेच गुणवंती प्रमोद खवले व उज्वला ज्ञानेश्वर पारधी(वानखडे) यांचे कडून मुख्यमंत्री सहायता निधी ला, लीना प्रदीप अंबाडकर यांचेकडून कुटीर रुग्णालय अचलपूर, सोनाली राहुल तट्टे यांचेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांचे वसतीगृह वज्झर, तसेच श्रीनाथ वानखडे यांचे कडून एकविरा मल्टिपरपज फौंडेशन अकोला येथे तेरविचा खर्च दान देण्याचा निर्धार केल्याने सगळी कडून मुलींच्या या कार्याला सलाम करताहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.