ग्रामीण भागातील मोठ्या उद्योगांसाठी कर्ज द्या – बालकल्याण सभापती अनुराधा चव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | ग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करणे, मका प्रक्रिया, विविध मॉल्स आणि कोल्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यासह इतर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

डाॅ. भागवत कराड यांना नुकतेच मंत्रिपद मिळाले आहे. डाॅ. कराड यांच्या रुपाने स्वातंत्र्यांच्या 64 वर्षानंतर पहिल्यांदा औरंगाबाद जिल्ह्याला केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली. यामुळे आता त्यांच्या कडून औरंगाबाद व मराठवाड्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या त्याच निमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच दिल्लीत अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांची भेट घेतली. यावेळी केंद्र शासनामार्फत जिल्हा परिषदेत राबवल्या जाणाऱ्या योजना व त्यांना होणारा अर्थपुरवठा या संदर्भात चर्चा करण्यात आली.

सशक्त महिला अभियानाच्या माध्यमातून बचत गटांना छोटा उद्योग उभारण्यासाठी कर्ज दिले जाते. पण मोठ्या उद्योगांना कर्ज दिले जात नाही. या ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठ्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावेळी डाॅ. कराड यांना दिलेल्या निवदेनात अनुराधा चव्हाण यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी जि. प. सदस्य किशोर पवार, संजय खंबायते, रमेश जाधव, उपस्थित होते.

Leave a Comment