धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 15 दिवस बलात्कार केला आहे. यानंतर पंधरा दिवसांनी किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर आरोपीने पीडितेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. यानंतर पीडित मुलीने परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव जनक यादव असून तो परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणचा रहिवाशी आहे. आरोपी जनक यादवने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर त्याने 20 जून 2021 रोजी परळीतील एका लॉजवर या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. हा आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीला परळी शहरातील कंडक्टर कॉलनीत भाड्याच्या खोलीत ठेवले. याठिकाणी आरोपीने आरोपीने सलग 15 दिवस तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने किरकोळ कारणावरून तिला मारहाण करत तिला जातीवाचक शिवीगाळ करत लज्जास्पद वागणूक दिली.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत आरोपीने आपले खरे रंग दाखवल्याने पीडित अल्पवयीन मुलीने आरोपीविरोधात परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment