राज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे देवा ; तृप्ती देसाईंच देवाकडे साकडं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंभीरपणे उभे राहून कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. या अशात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर भाजपकडून मात्र टीकास्त्र सोडले जात आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांच्या पाठीशी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या उभ्या राहिल्या आहेत. “कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी काम करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवाने शक्ती द्यावी,” असं साकडं देसाईंनी देवाकडे घातलं आहे.

राज्यात महिलांना मंदीर प्रवेश आणि महिलांच्या हक्कांसंबंधीच्या विविध मागण्यासंबंधी आंदोलने करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी कोरोनाच्या संकटात देवाकडे साकडे घातले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटल आहे कि, “मागील वर्षीपासून महाराष्ट्रावर आलेलं करोनाचं संकट, निसर्ग चक्रीवादळ, शेतकऱ्यांवर आलेली नैसर्गिक संकटे यातू राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सुरक्षित बाहेर काढत संकटमोचन म्हणून काम केले आहे. मात्र, यावर्षीही पुन्हा कोरोना व चक्रीवादळ अशी संकते आलेली आहेत. अजून किती संकटं येणार आहेत माहिती नाही. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षितपणे या संकटांतून बाहेर काढण्यासाठी देवाने शक्ती द्यावी, हीच प्रार्थना आहे.’

राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभय राहिलेल्या भाजपकडून अनेक प्रकारचे आरोप, हल्लाबोल केले जात आहे. अशा परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे समर्थन करण्यासाठी अनेक संघटना व त्यातील प्रमुखांनी येणे गरजेचे आहे. मात्र तसे दिसत नाही. अशा कोरोनाच्या परिस्थितीत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची बाजू घेतली आहे.

अशा परिस्थितीत देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली आहे. ही संकटे हातळण्यात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतूक करून त्यांच्यासाठी परमेश्वराला साकडं घातलं आहे. मात्र, यामध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव घेण्याचं टाळत केवळ मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी हे साकडं घातलं आहे.

Leave a Comment