गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल !

बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांचे घरचे लोकं एकत्र येतात आणि एक सोहळा करून त्यांची मैत्री जाहीर करतात. ह्या सोहळ्यात दोन्ही घरचे सगळे लोकं असतात. गावचे लोक असतात. पूजा – अर्चा होते. मंत्रपठण होतं. जेवणाच्या पंगती बसतात.

याचेही काही नियम असतात. मुलगा आणि मुलगा यांचीच मैत्री होऊ शकते. आणि एक मुलगी आणि दुसरी मुलगी यांचीच अशी मैत्री होऊ शकते. मुलगा – मुलगी यांची अशी मैत्री होऊ शकत नाही.
आणि नात्यातल्या मुलामुलीशी असं नातं बनत नाही.
गिया किंवा मितान कोणत्याही जातीचा असला तरी चालतं ही अजून एक महत्त्वाची गोष्ट.

एका मुलाची दुसऱ्या मुलाशी मैत्री झाली तर त्याला ‘मितान’ म्हणतात. आणि मुलीशी-मुलीशी असणाऱ्या मैत्रीला ‘गिया’ म्हणतात. हें नातं जोडताना लग्नासारखा मोठा सोहळा केला जातो. आणि हे नातं त्यांना आयुष्यभर जोपासायच लागेल ही समाजाची त्यांच्याकडून अपेक्षा असते. एकमेकांचे गिया किंवा मितान असणारे लोकं एकमेकांच्या आई- वडिलांनाही आई – वडीलच समजतात आणि त्यांना आई वडील असच पुकारतात. त्यांच्या नंतरच्या पिढीलाही हे नातं जोपासावच लागतं.

जातीची क्रायटेरीया सोडला तर हे लग्नाच च एक रूप आहे असं वाटावं इतक ते लग्न ह्या संकल्पनेशी सान्धर्म्य साधतं.

ठिकाण – गेजामौडा

जिल्हा – रायगड

राज्य – छत्तीसगढ

श्वेता पाटील

Leave a Comment