Glenn Maxwell Century : वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात स्टार ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल याने वादळी शतक ठोकले आहे. मॅक्सवेलने 50 बॉलमध्ये शतक झळकावत मेदानाच्या चारही बाजूनी चौफेर टोलेबाजी केली. मॅक्सवेलने ५५ चेंडूत १२० धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या टी 20 कारकिर्दीतील हे पाचवं शतक ठरलंय. या शतकानंतर मॅक्सवेलने भारताच्या सूर्यकुमार यादवला शंतकांच्या बाबतीत मागं टाकलं आहे, तर भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या ५ शतकांची बरोबरी केली आहे.
मॅक्सवेलने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घेतला समाचार – Glenn Maxwell Century
वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा दुसरा टी 20 सामना (AUS Vs WI) अडलेड येथील मैदानावर खेळवण्यात आला. यावेळी वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीने वेस्ट इंडिज चा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५७-२ अशी असताना मॅक्सवेल मैदानात उतरला आणि चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ५५ चेंडूत १२० धावांची ऐतिहासिक शतकी खेळी (Glenn Maxwell Century) त्याने केली. या खेळी दरम्यान मॅक्सवेलने १२ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. मॅक्सवेलच्या या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० ओव्हर मध्ये ४ गडी गमावून २४१ धावांचा डोंगर उभारला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ २०७ धावाच करू शकला. वेस्ट इंडिज कडून रोमन पॉवेलने ३६ चेंडूत सर्वाधिक ६४ धावा केल्या, मात्र त्याला इतर फलंदाजांची साठी मिळाली नाही. पॉवेल शिवाय जॉन्सन चार्ल २४ आणि आंद्रे रसेलने ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया कडून मार्क्स स्टोइनीसने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर हेझलवुड आणि जॉन्सनने प्रत्येकी २ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने या विजयानंतर 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत २-० अशी आघाडी घेत सिरीज जिंकली आहे. आता तिसरा टी 20 सामना १३ फेब्रुवारीला पर्थ येथील मैदानावर होणार आहे.
मॅक्सवेलने केली रोहित शर्माच्या ५ शतकांची बरोबरी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या शतकानंतर ग्लेन मॅक्सवेलने भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या ५ शतकांशी बरोबरी केली आहे. रोहितच्या नावावर सुद्धा आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात ५ शतके आहेत. त्यामुळे टी 20 मध्ये सर्वाधिक शतके मारणाऱ्या यादीत मॅक्सवेल आणि रोहित संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. मात्र रोहितने 143 डावांमध्ये 5 शतकं केली आहेत. तर मॅक्सवेलने 94 व्या डावातच हा रेकॉर्ड केला आहे.