ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या ताफ्यात ; कोहली-एबी सोबत जमणार जोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या आयपीएल मध्ये चांगलाच मालामाल झाला आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मॅक्सवेलला तब्बल 14 कोटी 25 लाख रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले आहे.ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेत मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे यावेळी मॅक्सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचे पाहायला मिळाले.

मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी यांच्यामध्ये चांगलीच स्पर्धा लागली होती. १४ कोटी २५ लाख रुपये मोजत अखेर आरसीबीने मॅक्सवेलला आपल्या संघात स्थान दिल्याचे पाहायला मिळाले.

आरसीबीच्या संघात विराट कोहली, एबी डीविलीर्स सारखे आक्रमक फलंदाज असताना मॅक्सवेलही सामील झाल्याने आरसीबीची बॅटिंग लाइनअप मात्र तगडी झाली आहे यात शंका नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’