फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणला बीचवर नग्नावस्थेत धावणे पडले महागात; गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोवा । अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ४ नोव्हेंबरला मिलिंद सोमणनं वाढदिवसानिमित्त समुद्रावर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो प्रसिद्ध केला होता. गोव्याच्या समुद्र किनारी हा फोटो काढला होता. त्यामुळे त्याच्यावर अश्लील कृत्य आणि गाणी तसंच इलेक्ट्रॉनिक स्वरुपात अश्लील सामग्री प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फिटनेसबद्दल मिलिंद सोमण कायमच सगळ्यांना प्रेरणा देत असतो. यावेळी त्याने एक पाऊल पुढे होऊन समुद्र किनारी धावणारा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत तो Naked Run करत आहेत. त्याचा हा फोटो त्याची पत्नी अंकिता कोनवरने क्लिक केला आहे. पण हाच फोटो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. हॅप्पी बर्थ डे टू मी म्हणत #55 असं म्हणतं मिलिंद सोमणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच फोटो क्रेडिट अंकिताला दिलं आहे.

https://www.instagram.com/p/CHJ5XC3HQT9/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, गोव्यातील धरणावर आक्षेपार्ह चित्रिकरण केल्याने मॉडेल पूनम पांडेला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पूनम पांडेला २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. याशिवाय व्हिडीओच्या चित्रिकरणादरम्यान पूनम पांडे हिच्याजवळ उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचार्‍यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कॅनकोना पोलिसांनी पूनमला अगौदा येथील रिसॉर्टमधून अटक केली आहे. या प्रकरणात अश्लील फोटो शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तीवरही गुन्हा दाखल आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment