पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट ; ‘गोएअर’ ने पायलटची केली हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं संबंधित पायलटची हकालपट्टी केली आहे. मिकी मलिक असं गोएअरने कामावरून काढून टाकलेल्या पायलटचे नाव आहे. पंतप्रधानांविषयी अवमानकारक विधान केल्याप्रकरणी पायलटला तात्काळ कामावरून निलंबित केलं असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

मिकी मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. मलिकच्या ट्विटवर आक्षेप घेत कंपनीने ही कारवाई केली. “पंतप्रधान मुर्ख आहेत. तुम्ही मलाही मुर्ख म्हणू शकता. मला वाईट वाटणार नाही. कारण की, मी पंतप्रधान नाही. पण पंतप्रधान मुर्ख आहेत,” असं अशी टीका मलिक यांनी ट्विटमधून केली होती. मलिक यांच्या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी संताप व्यक्त केला. वाद निर्माण झाल्यानं मलिक यांनी ते ट्विट उडवलं. त्याचबरोबर माफीही मागितली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो. ट्विटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती अशी सारवासारव त्यांनी नंतर केली.

दरम्यान, या प्रकरणी गोएअरने मलिक यांना तडकाफडकी कामावरून कमी केलं आहे. “गोएअरची अशा प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि ती कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना बंधनकारण आहे. गोएअरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचं, कायद्यांचं आणि सोशल मीडिया संबंधित धोरणांचं पालन करणे बंधनकारक आहे,” असं गोएअरच्या प्रवक्त्यांनी या कारवाईबद्दल बोलताना सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment