सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नूडल्सच्या नावाखाली गाेवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पडकण्यात आली आहे. कराड हद्दीत कुडाळ येथील पथकाने ही कारवाई केली असून 1 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी, एका नूडल्सच्या कंपनीचा माल म्हणून गोव्यातून आणलेली ट्रकभरुन दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी कराड तालुक्यातील मालखेड येथे पकडली. या ट्रकमध्ये अंदाजे सुमारे साठ लाखांच्या विदेशी मद्यासह पाेलिसांनी वाहन जप्त करुन एकास ताब्यात घेतले आहे.
ट्रक चालकाने नूडल्सची वाहतूक करत असल्याची पावती दाखवून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करीत असल्याचे पथकाच्या तपासणीत निदर्शनास आले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात दारुचे बाॅक्स आढळले. सदरचा ट्रक गोव्याहून नाशिकला दारू घेवून निघाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक केली आहे.