‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
दिल्ली येथे एका तरूणाने जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटनेवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहे. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतआपली भूमिका मांडत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री  जयंत पाटील यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, आजच्या सत्ताधीशांना विरोध काही सहन होत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अस सांगून जयन्त पाटील पुढे म्हणाले, जामिया येथे झालेल्या गोळीबाराचा मी निषेध करतो. विरोध होतोय म्हणून केंद्र सरकारने चिडू नये. लोक शांतपणे आंदोलन करत आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांना संरक्षण द्या अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

जामियामध्ये गोळीबारासाठी ‘त्या’ तरुणाचा हिंदू महासभा करणार सत्कार

उर्मिला मातोंडकरला सोशल मीडियावर केलं जात आहे ट्रोल; काय आहे कारण..

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

Leave a Comment