गोकूळ दुध 4 रुपयांनी महागले! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने आपल्या दूध विक्री दरात प्रति लिटर चार रुपयांनी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे दुधाचा दर प्रति लिटर 54 रुपयांवरून 58 रुपये झाला आहे. ही वाढ मुंबई-पुणे वगळता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात होणार आहे. इंधनाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढल्याने गोकुळच्या विक्री दरात वाढ झाली आहे. शनिवारी 16 एप्रिल पासून ही दूध दरवाढ अंमलात येणार आहे, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

गोकुळने पंधरा दिवसापुर्वी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. साधारणता खरेदी बरोबर विक्री दरात वाढ होते, मात्र संघाने केवळ खरेदी दरात वाढ केल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पकाळच ठरला, संघाने खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करत असताना मात्र विक्री दरात चार रुपयांची वाढ करुन ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे.

देशात आधीच महागाईने सर्वसामान्य जनतेला हैराण केलं. एकीकडे गॅस दरवाढ, पेट्रोल डीझेलच्या दरात झालेली वाढ, यामुळे जनतेच्या खिशाला कात्री बसली असतानाच आता गोकुळच्या दूध दरात वाढ झाल्याने या महागाईची मोठी झळ सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

Leave a Comment