सलग ४ दिवसांच्या भाववाढी नंतर सोने पडले! जाणुन घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशातील सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत होती.परंतु सलग चार दिवस सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज त्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.शुक्रवारच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम २०१ रुपयांची घट झाली आहे,त्यानंतर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६४०६ वर गेली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरामध्ये आज किंचितसी घट झाली आहे.

आजची किंमत काय आहे
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे,ज्यामुळे सराफा बाजार बंद आहेत आणि त्यामुळे लोक सोने खरेदी अथवा विकू शकलेले नाहीत. जरी लोक सोने-चांदी विकत घेऊ शकत नाहीयेत,परंतु तरीही सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. देशातील १४ केंद्रांविषयी बोलताना येथे सोन्या-चांदीच्या किंमती सातत्याने अपडेट केल्या जात आहेत.९९९ शुद्ध सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी ४६४०६ रुपये एवढी आहे, तर ९९५ शुद्ध सोन्याची किंमत ४६,२२०रुपये आहे,९१६ शुद्ध सोन्याची किंमत ४२,५०८ रुपये इतकी आहे,तर ७५० शुद्ध सोन्याची किंमत ३४,८०५ आहे,५८५ शुद्ध सोन्याची किंमत २७१४८ आहे.९९९ शुद्ध चांदीची किंमत ४२०२० प्रति किलो आहे. म्हणजेच चांदीच्या किंमतीत प्रति किलो दहा रुपये घट झाली आहे.

वेगवेगळ्या किंमती
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ऑफ दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला म्हणतात की इब्जाने देशातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीच्या किंमती गोळा केल्या आहेत आणि त्यावरून सध्याचा दर नोंदविला आहे. सोने आणि चांदीची प्रचलित किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते. जरी त्यामध्ये फारसा फरक नसला तरी थोडासा फरक मात्र जरूर आहे.

अक्षय तृतीयेवर सोनं होतं स्वस्त
अक्षय तृतीयेवर सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५३४० रुपये होती. शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६६०७ रुपये झाली.९९९ शुद्ध सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम (जीएसटीशिवाय) ४६.,६०७ वर पोहोचली.९१६ शुद्धतेची सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४२,६९२ होती तर चांदीची किंमत प्रति किलो ४२,०३० इतकी होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment