Gold Hallmarking: नवीन हॉलमार्क नियमाच्या विरोधात ज्वेलर्स 23 ऑगस्ट रोजी करणार आहेत संप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोन्याच्या दागिन्यांच्या अनिवार्य हॉलमार्किंगची मनमानी पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील ज्वेलर्स 23 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करणार आहेत. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. GJC ने दावा केला आहे की,” या संपाला जेम्स अँड ज्‍वेलरी इंडस्ट्रीच्या चारही क्षेत्रांतील 350 संघटना आणि महासंघांनी पाठिंबा दिला आहे.”

16 जूनपासून टप्प्याटप्प्याने गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे
16 जूनपासून टप्प्याटप्प्याने गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात अनिवार्य गोल्ड हॉलमार्किंग लागू करण्यासाठी 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 256 जिल्ह्यांची निवड केली गेली आहे. मौल्यवान धातूच्या शुद्धतेचा पुरावा मानले जाणारे सोन्याचे हॉलमार्किंग आतापर्यंत ऐच्छिक होते.

GJC चे माजी अध्यक्ष अशोक मिनावाला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “एकदिवसीय लाक्षणिक संप हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) च्या मनमानी अंमलबजावणीविरोधात आमचा शांततापूर्ण निषेध आहे, जो कायद्यानुसार अव्यवहार्य आणि अशक्य आहे.” ते म्हणाले की,” ज्वेलर्स नवीन HUID स्वीकारू शकत नाहीत कारण त्याचा सोन्याच्या शुद्धतेशी काहीही संबंध नाही. BIS ला असे वाटते की, नवीन HUID सोन्याची शुद्धता सुधारेल परंतु ज्वेलर्सना वाटते की, ही फक्त ट्रॅकिंग सिस्टीम आहे.

HUID सिस्टीमला अत्यंत वेळखाऊ असल्याचे सांगून GJC चे संचालक दिनेश जैन म्हणाले की,” हॉलमार्किंग केंद्रांची सध्याची गती आणि क्षमता दररोज सुमारे दोन लाख तुकडे आहे. या वेगाने, या वर्षीच्या उत्पादनाची ओळख होण्यास 3-4 वर्षे लागतील.” ते असेही म्हणाले कि, “सध्या, नवीन HUID सिस्टीम उत्पादनांना हॉलमार्किंग करण्यासाठी सुमारे 5 ते 10 दिवस घेत आहे, परिणामी संपूर्ण अडथळे आणि उद्योग ठप्प आहेत.”

मुंबई होलसेल गोल्ड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कागरेचा म्हणाले की,”ज्वेलर्सनी हॉलमार्किंगचे स्वागत केले आहे आणि 88000 ज्वेलर्सनी त्यासाठी स्वतःची नोंदणीही केली आहे जे दर्शविते की, ज्वेलर्स त्यांच्या ग्राहकांसाठी वचनबद्ध आहेत. मात्र, हॉलमार्किंग केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 83 केंद्रे एकतर रद्द किंवा बंद करण्यात आली.

Leave a Comment