लाॅकडाउनमध्ये SBI देतंय मोजक्या अटींवर गोल्ड लाेन; ‘अशी’ आहे प्रक्रीया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या या काळात जर आपल्याला रोख रकमेची आवश्यकता भासल्यास अस्वस्थ होऊ नका. घरात ठेवलेले सोने या कठीण काळात आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) पर्सनल गोल्ड लोन ऑफर आणली आहे. याद्वारे आपण सोन्यावर कर्ज घेऊन आपल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकता. याअंतर्गत ग्राहक २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात. एसबीआयच्या म्हणण्यानुसार बँकांनी कमीतकमी कागदपत्रे आणि कमी व्याजदरासह बँकेतून विकल्या गेलेल्या सोन्याच्या नाण्यांसह इतरही सोने तारण ठेवून हे गोल्ड लोन घेता येते. गोल्ड लोनबद्दल सर्व काही जाणून घ्या…

 

गोल्ड लोन कोण कोण घेऊ शकेल?
एसबीआय कडून १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्ती पर्सनल गोल्ड लोन साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. व्यक्ती एकत्याने किंवा संयुक्त आधारावर अर्ज करू शकतात आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा एखादा स्थिर स्रोत असणे आवश्यक आहे. या कर्जासाठी आपल्याला उत्पन्नाचा कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नाही.

व्याज दर
एक वर्षाच्या गोल्ड लोनसाठी एसबीआय MCLR पेक्षा 0.75% व्याज दर देते. बँकेच्या वेबसाइटनुसार, 15 मे 2019 ते 15 जुलै 2020 पर्यंत बँकेचे एक वर्षाचे MCLR 7.25% आहे. याचा अर्थ एसबीआय पर्सनल गोल्ड लोन योजनेचा व्याज दर 7.75% आहे. एसबीआय कर्जाच्या रकमेच्या 0.50% आणि गोल्ड लोनसाठी प्रक्रिया शुल्क म्हणून किमान 500 रुपये (जीएसटी दोन्हीसाठी लागू) घेते.

तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल
जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. यासाठी किमान कर्जाची रक्कम 20,000 रुपये आहे. एसबीआयकडे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या पेबॅकचा कालावधी असतो. मूळ कर्जाची परतफेड आणि गोल्ड लोनचे व्याज वितरण डिस्बर्समेंटच्या महिन्यापासून सुरू होईल. लिक्विड गोल्ड लोन आणि मासिक व्याजासह ओव्हरड्राफ्टची व्यवहार सुविधा खात्यानुसार ठरविली जाते. बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन योजनेत कर्जाच्या कालावधीआधी किंवा खाते बंद झाल्यावर कर्जाची परतफेड ही एकरकमी असू शकते. एसबीआय गोल्ड आणि लिक्विड गोल्ड लोन या दोहोंची कमाल परतफेड ही ३६ महिने आहे, तर एसबीआय बुलेट रिपेमेंट गोल्ड लोनची मुदत हि १२ ​​महिने आहे.

अर्ज कसा करावा
कर्ज मंजूर करण्याची आणि निधी वितरणाची प्रक्रिया अगदी सोपी आहे. गोल्ड लोनसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात.
>> दोन छायाचित्रांसह दोनप्रतींमध्ये गोल्ड लोनसाठीचा अर्ज.
>> पत्त्याच्या पुराव्यांसह ओळखीचा पुरावा.
>> अशिक्षित कर्जदारांच्या बाबतीत साक्षीचे पत्र.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment