हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price – अनेक महिन्यापासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या किमतींनी ग्राहकांसोबतच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हि वाढ काही कारणांमुळे होऊ शकते. तसेच सोनं लवकरच 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठेल असा अंदाज अनेकांनी लावला आहे. तर चला या महत्वाच्या बातमीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सोन्याचे दर वाढण्याची कारणे (Gold Price) –
आयात शुल्क पुन्हा वाढवू शकते –
सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्क वाढवण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयात शुल्क 15% वरून 6 % वर आणले होते . या कारणांमुळे सोनं स्वस्त (Gold Price) झाले होते , तसेच मागणी प्रचंड वाढली होती. पण ही वाढलेली मागणी सरकारच्या तिजोरीवर बोजा ठरली आहे. वित्तीय तूट नियंत्रित करण्यासाठी सरकार आयात शुल्क पुन्हा वाढवू शकते, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होईल.
भौगोलिक आणि राजकीय तणाव –
जगभरातील भौगोलिक आणि राजकीय तणाव, जसे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले कठोर निर्णय, पॅरिस हवामान करारातून माघार आणि डब्ल्यूएचओमधून माघार घेणे, तसेच ब्रिक्स देशांवरील कठोर धोरणात्मक भूमिका, यामुळे बाजारपेठेतील अस्थिरता वाढली आहे. याचा परिणामही सोन्याच्या दरावर होईल.
फेडरल रिझर्व्हचे व्याजदर –
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केले आहेत, ज्यामुळे सोन्याच्या किमतींवर सकारात्मक प्रभाव पडला आहे. व्याजदर कमी झाल्यामुळे सोनं कमी जोखमीच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय बनतं, आणि त्यामुळे त्याची मागणी वाढते.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य (Gold Price) –
डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य घटत आहे. 22 जानेवारी 2025 रोजी रुपया प्रति डॉलर 86.26 च्या पातळीवर पोहोचला होता. रुपया आणखी कमजोर झाला, तर भारतात सोन्याची आयात महाग होईल, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल.
लग्नाचा हंगाम आणि गुंतवणुकीचा ओघ –
ऑल बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांच्या मते, सोन्याच्या ईटीएफसाठी वाढलेली मागणीही किमती वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे लग्नाचा हंगाम आणि गुंतवणुकीचा ओघ यामुळे सोन्याची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यंदा ही मागणी 85,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत किंमत पोहोचवू शकते.
सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता –
जागतिक तणाव आणि स्थानिक आर्थिक धोरणांच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेतल्यास, ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी सोनं खरेदी करण्यापूर्वी बाजाराच्या स्थितीचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Price) वाढ होण्याची शक्यता आहे, कारण सरकारी धोरणे, आयात शुल्क आणि आंतरराष्ट्रीय तणाव यांचा थेट प्रभाव सोन्याच्या किमतींवर पडू शकतो.
हे पण वाचा : बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा? किसान सन्मान निधीच्या हप्त्यात होणार वाढ?
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु