हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : या आठवड्यात सोन्याच्या दरात भारतीय सराफा बाजारात वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घट झाली आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 697 रुपयांनी वाढला तर चांदीचा भाव 3059 रुपये प्रति किलोने घसरला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (27 जून ते 1 जुलै) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,094 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,791 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 60,832 रुपयांवरून 57,773 रुपये प्रति किलोवर आला.
इथे हे लक्षात घ्या कि, IBGA ने जारी केलेल्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किंमतींची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र या किंमतींमध्ये GST सामील केली जात नाही. Gold Price
गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात झालेला बदल
27 जून 2022 – 51,094 रुपये प्रति 10 ग्रॅम
28 जून 2022 – 51,029 रुपये प्रति 10 ग्रॅम
29 जून 2022- 51,159 रुपये प्रति 10 ग्रॅम
30 जून 2022 – 50,863 रुपये प्रति 10 ग्रॅम
01 जून 2022- रुपये 51,791 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात झालेला बदल
27 जून 2022- 60,832 रुपये प्रति किलो
28 जून 2022- 60,518 रुपये प्रति किलो
29 जून 2022- रुपये 59,853 प्रति किलो
30 जून 2022- रुपये 58,803 प्रति किलो
01 जुलै 2022- रुपये 57,773 प्रति किलो
सोन्यावरील आयात शुल्कात वाढ (Gold Price)
केंद्र सरकार कडून नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. यावेळी आयात शुल्कात 7.5% वरून 12.5% वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे आता देशातील सोन्याच्या किंमतीं मध्ये वाढ होणार आहे. देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या
आपले हरवलेले Credit Card कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Indian Bank कडून कर्ज घेणे महागणार, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढला !!!
Business Idea : कागदापासून ‘या’ वस्तू तयार करून मिळवा भरपूर पैसे !!!