Gold Price : सोने अजूनही 48 हजार रुपयांच्या खाली, सोन्याचा आजचा नवीन दर त्वरित तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.09 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांनी वाढ होत आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही ते विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त झाले आहे. 2020 सालाबद्दल बोलायचे झाले तर ऑगस्ट महिन्यापर्यंत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज डिसेंबरचा फ्युचर्स MCX वर सोने 47,968 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8232 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव जाणून घ्या
ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरीसाठीच्या सोन्याची किंमत 0.09 टक्क्यांनी वाढून आज 47,968 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.19 टक्क्यांनी वाढली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 64,964 रुपये आहे.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,580 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,980 रुपये
पुणे – 46,310 रुपये
नागपूर – 46,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,980 रुपये
पुणे – 49,580 रुपये
नागपूर – 47,980 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4632.00 Rs 4714.00 1.739 %⌃
8 GRAM Rs 37056 Rs 37712 1.739 %⌃
10 GRAM Rs 46320 Rs 47140 1.739 %⌃
100 GRAM Rs 463200 Rs 471400 1.739 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4959.00 Rs 5047.00 1.744 %⌃
8 GRAM Rs 39672 Rs 40376 1.744 %⌃
10 GRAM Rs 49590 Rs 50470 1.744 %⌃
100 GRAM Rs 495900 Rs 504700 1.744 %⌃
You might also like