Gold Price : सोन्याच्या दरात किंचित घट तर चांदी महागली, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील बदलानंतर गुरुवारी सकाळी सोन्याच्या दरात किंचित बदल दिसून आला तर चांदीने कमालीची उसळी घेत पुन्हा 68 हजारांच्या वर पोहोचली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.10 वाजता 24 कॅरेट सोन्याचा फ्युचर्स भाव 7 रुपयांनी घसरून 51,140 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, चांदीच्या फ्युचर्स किमतीत 1,151 रुपयांची जबरदस्त उसळी झाली. एका दिवसापूर्वी म्हणजे सुमारे महिनाभरानंतर चांदी 68 हजारांच्या खाली पोहोचली होती, मात्र आज पुन्हा ही पातळी ओलांडून 68,455 रुपये प्रति किलोने विक्री झाली.

जागतिक बाजारातही सोन्याचा भाव चढला
जागतिक बाजारात, सोन्याच्या स्पॉट किंमती आज सकाळी पुन्हा चढू लागल्या आणि प्रति औंस $ 1,930 पर्यंत पोहोचल्या. सोन्याच्या भावात वाढ होण्याचे कारण म्हणजे यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ. जागतिक बाजारात चांदीची किंमत 0.75 डॉलरने वाढून 25.46 डॉलर प्रति औंस झाली आहे.

त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवल्यानंतर डॉलर इंडेक्स घसरला आणि जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढू लागले. सोन्याच्या किमतीत गेल्या सहा सत्रांपासून सातत्याने घसरण होत आहे. या दरम्यान प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 4 हजार रुपयांनी खाली आला आहे. पहिल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,790 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,760 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,810 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,450 रुपये
पुणे – 47,480 रुपये
नागपूर – 47,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,760 रुपये
पुणे – 51,790 रुपये
नागपूर – 51,810  रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4735.00 Rs 4768.00 0.692 %⌃
8 GRAM Rs 37880 Rs 38144 0.692 %⌃
10 GRAM Rs 47350 Rs 47680 0.692 %⌃
100 GRAM Rs 473500 Rs 476800 0.692 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5165.00 Rs 5201.00 0.692 %⌃
8 GRAM Rs 41320 Rs 41608 0.692 %⌃
10 GRAM Rs 51650 Rs 52010 0.692 %⌃
100 GRAM Rs 516500 Rs 520100 0.692 %⌃

Leave a Comment