Thursday, October 6, 2022

Buy now

Gold Price : सोन्या-चांदीचे भाव घसरले, आजचे दर त्वरित तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सोने आणि चांदीचे दर घसरणीसह उघडले. वाटाघाटीद्वारे रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याच्या आशेने या मौल्यवान धातूंचे दर खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.

गुरुवार, 10 मार्च 2022 रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदी घसरली आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर्स सकाळी 9.38 वाजता 0.40% घसरून 52,532 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होते, तर चांदी 0.25% घसरून 69,404 रुपये प्रति किलो होता. मागील सत्रात सोन्याचा भाव ₹1,500 प्रति 10 ग्रॅम आणि चांदी सुमारे ₹ 2000 प्रति किलोने घसरली होती. बुधवारी दिवसभरात सोन्याचा भाव 55,200 रुपयांवर पोहोचला होता.

जागतिक बाजारपेठेत किंमती विक्रमी पातळीवर आहेत
जागतिक बाजारात सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी घसरून $2,040.07 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. यापूर्वी ते $2,069.89 च्या पातळीवर पोहोचले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, जागतिक बाजारात सोन्याची किंमत $2,072.49 प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर होती.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,630 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,630 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,200 रुपये
पुणे – 48,250 रुपये
नागपूर – 48,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,580 रुपये
पुणे – 52,630 रुपये
नागपूर – 52,630  रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4983.00 Rs 4949.00 -0.687 %⌄
8 GRAM Rs 39864 Rs 39592 -0.687 %⌄
10 GRAM Rs 49830 Rs 49490 -0.687 %⌄
100 GRAM Rs 498300 Rs 494900 -0.687 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5436.00 Rs 5396.00 -0.741 %⌄
8 GRAM Rs 43488 Rs 43168 -0.741 %⌄
10 GRAM Rs 54360 Rs 53960 -0.741 %⌄
100 GRAM Rs 543600 Rs 539600 -0.741 %⌄