Gold Price : सोन्या-चांदीचे दर वाढले, आजची किंमत पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील किंमतीत वाढ झाल्यामुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. मल्टीकमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दराने पुन्हा 52 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

MCX वर, 9.10 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 308 रुपयांनी वाढून 57,075 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एक्सचेंजवर ट्रेडिंगच्या सुरुवातीला सोन्याचा भाव 51,702 रुपयांवर उघडला होता. यानंतर वाढत्या मागणीमुळे पिवळ्या धातूचे भाव वाढतच गेले आणि काही मिनिटांतच 52 हजार रुपयांची पातळी ओलांडली.

चांदी देखील चमकली
MCX वर, सकाळी चांदीची सुरुवात मजबूत होती आणि मोठ्या उसळीसह 69,663 रुपये प्रति किलोवर उघडली. मात्र, जसजसे ट्रेडिंग वाढत गेले तसतसे गुंतवणूकदारांनी काही विक्री करून नफा बुक करण्यास सुरुवात केली. असे असतानाही चांदीचा दर 130 रुपयांनी वाढून 69,450 रुपये किलो झाला.

जागतिक बाजारातही तेजी दिसून आली
रशिया-युक्रेन संकटाच्या काळात क्रूड आणि गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने गुंतवणूकदारही सोने-चांदीच्या खरेदीत वाढ करत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.22 टक्क्यांनी वाढून $1,962.85 प्रति औंस झाला आहे तर चांदीचा भावही 0.16 टक्क्यांनी वाढला आहे आणि त्याची विक्री $25.96 प्रति औंस झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,590 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,590 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,640 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,200 रुपये
पुणे – 48,300 रुपये
नागपूर – 48,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,590 रुपये
पुणे – 52,690 रुपये
नागपूर – 52,640 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4805.00 Rs 4742.00 -1.329 %⌄
8 GRAM Rs 38440 Rs 37936 -1.329 %⌄
10 GRAM Rs 48050 Rs 47420 -1.329 %⌄
100 GRAM Rs 480500 Rs 474200 -1.329 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5235.00 Rs 5174.00 -1.179 %⌄
8 GRAM Rs 41880 Rs 41392 -1.179 %⌄
10 GRAM Rs 52350 Rs 51740 -1.179 %⌄
100 GRAM Rs 523500 Rs 517400 -1.179 %⌄

Leave a Comment