Gold Price: सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचा सोन्याचा भाव तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नसराईच्या या मोसमात सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदी स्वस्त झाली आहे. आज, बुधवार 8 डिसेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गोल्ड फेब्रुवारी फ्युचर्स 69.00 रुपयांनी वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह सोन्याचा भाव 48,129.00 रुपयांवर आहे.

त्याच वेळी, चांदीचा मार्च वायदा 74.00 रुपयांनी घसरून 61,754.00 वर आला आहे. आज चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,840 रुपये
पुणे – 46,280 रुपये
नागपूर – 47,840 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,510 रुपये
पुणे – 49,550 रुपये
नागपूर – 47,840 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4609.00 Rs 4609.00 0 %
8 GRAM Rs 36872 Rs 36872 0 %
10 GRAM Rs 46090 Rs 46090 0 %
100 GRAM Rs 460900 Rs 460900 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4932.00 Rs 4932.00 0 %
8 GRAM Rs 39456 Rs 39456 0 %
10 GRAM Rs 49320 Rs 49320 0 %
100 GRAM Rs 493200 Rs 493200 0 %