विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वधारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे. सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा ३९३०० (वस्तू व सेवा कर सहित )आहे. कालच्यापेक्षा हा दर वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर १ हजार ५०३ डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर १७.४७ डॉलर प्रति औंस आहे.

२०१० साली १८००० ते १९००० च्या दरम्यान असलेला सोन्याचा दर आता २०१९ मध्ये ४० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर ३१ हजार ९१२ होता. तो आता ३९ हजार ३०० झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढलेल्या किमती, अमेरिका – चीन ट्रेड वॉर, भारतीय रुपयाचं गडगडलेलं मूल्य, जागतिक मंदीसदृश परिस्थिती अशी अनेक कारणं सोन्याच्या भाववाढीमागे आहेत.

दसरा किंवा विजया दशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी आवर्जून सुवर्ण खरेदी केली जाते. त्यामुळे आजची दसऱ्याची भाववाढ ही स्थानिक बाजारातल्या वाढलेल्या मागणीमुळे झाली आहे. सोमवारी सोन्याच्या मागणीत घट झाल्याने दर कमी झाले होते. २०१० साली दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर होता १९ हजार ८२० आणि आजचा दर आहे ३९ हजार ३००. असाच २०१५ साली सोन्याचा दर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आदल्या वर्षी २६ हजार ८६२ असलेला दर २०१६ च्या दसऱ्याला २९ हजार ६७८ वर पोहोचला. गेल्या वर्षीच्या दसऱ्याला सोन्याचा दर ३१ हजार ९१२ होता. तो आता ३९ हजार ३०० झाला आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment