हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : साप्ताहिकरित्या भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 145 रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 81 रुपयांनी किंचित घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरूवातीस (23 जानेवारी ते 27 जानेवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर 57,044 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 68,273 रुपयांवरून 68,192 रुपये प्रति किलोवर आली आहे. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)
23 जानेवारी 2022 – 57,044 रुपये प्रति 10 ग्रॅम
24 जानेवारी 2022 – 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅम
25 जानेवारी 2022 – 57,138 रुपये प्रति 10 ग्रॅम
26 जानेवारी 2022 – बाजाराला सुट्टी
27 जानेवारी 2022 – 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)
23 जानेवारी 2022 – 68,273 रुपये प्रति किलो
24 जानेवारी 2022 – 68,137 रुपये प्रति किलो
25 जानेवारी 2022 – 67,894 रुपये प्रति किलो
26 जानेवारी 2022 – बाजाराला सुट्टी
27 जानेवारी 2022 – 68,192 रुपये प्रति किलो
सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, यंदा सोने 64 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकते. सध्याचा सोन्याचा ट्रेंड बघितला तर लवकरच सोने ही पातळी गाठू शकेल. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की,” सोन्याचे भाव यंदा चढेच राहू शकतात. सेंट्रल बँकेने सोने खरेदी केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम सोन्यावर दिसून येईल. ज्यामुळे 2023 मध्ये सोने 64 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.” Gold Price
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट