Gold Price : सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जग तणावात आहे. यामुळे कच्च्या तेलापासून ते महागाईपर्यंत अनेक नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. जगभरात अनेक वस्तूंच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. MCX वर सोन्याच्या किंमतीत मे 2021 पासूनची सर्वात मोठी वाढ दिसून आली आहे. आज MCX वर सोन्याची किंमत 52,549 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नजीकच्या काळात सोने 54,000 रुपयांची पातळी गाठू शकते, असे सर्व कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे.

रेलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेव म्हणतात की,” रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे बाजारात जोखीम वाढली आहे. ज्यामुळे लोकं सोन्यात मोठी गुंतवणूक करताना दिसत आहेत. सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाचे आवाहन आणखी वाढले आहे. वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मे 2021 नंतरची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ दिसून आली.”

सोने आणखी वाढण्याची शक्यता आहे
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध गंभीर स्वरूप धारण करेल. त्याचप्रमाणे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, इतर वस्तू आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाईशी संबंधित चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे महागाईला तोंड देण्यासाठी लोकं हेजिंगपॉलिसी खाली सोने खरेदी करताना दिसतात.

रुपयाची वाईट स्थिती
IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणतात की,” स्पॉट मार्केटमध्ये 2022 मध्ये आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 2.48 टक्क्यांनी घसरला आहे, तर 1 आठवड्यात 1.10 टक्क्यांनी घसरला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे भारतातून डॉलर्स काढून घेण्यास आणखी गती येईल, असा अंदाज आहे, त्यामुळे नजीकच्या काळात रुपया 77 च्या पातळीवर जाणार आहे.”

अनुज गुप्ता पुढे सांगतात की,”डॉलरच्या तुलनेत रुपयात 1 रुपयाचा बदल झाल्याने प्रति 10 ग्रॅम सोन्यामध्ये 250-300 रुपयांचा बदल होतो. अशा परिस्थितीत MCX वर सोन्याच्या किंमती वाढण्यामागे रुपयाचा कमकुवतपणा हे आणखी एक कारण असू शकते.”

अनुज गुप्ता पुढे म्हणतात की,” MCX सोने 53,800-54,000 च्या टार्गेटसह 51,500 – 51,800 च्या कॅटेगिरीमध्ये खरेदी केले जाऊ शकते. यासाठी, तुम्ही 51,000 रुपयांचा स्टॉप लॉस सेट केला पाहिजे.”

Leave a Comment