Gold Price Today: होळीनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घट; ग्राहकांनो, खरेदीपूर्वी पाहून घ्या आजचे भाव

Gold Price Today 19 july
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| यंदा होळीच्या सणात नागरिकांना महागाईचा मोठा तडाखा बसला आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज दोन्ही धातूंनी नवे उच्चांक गाठले आहेत. सोन्याने 90 हजारांचा टप्पा पार केला आहे तर चांदी लाखाच्या घरात पोहोचली आहे. मागील तीन दिवसांत या मौल्यवान धातूंनी महागाईचे नवे रेकॉर्ड मोडले आहेत.

सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ ग्रॅमसाठी ८,९५६ रुपये आहे. कालच्या तुलनेत या किंमतीत ८८ रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज १० ग्रॅम (१ तोळा) २४ कॅरेट सोन्याची किंमत ८९,६७० रुपये इतकी आहे. आज २२ कॅरेट सोन्याची किंमत पाहिला गेलो तर १ ग्रॅमसाठी ८,२२० रुपये मोजावे लागत आहेत. कालच्या तुलनेत यामध्ये १०० रुपयांची किंचित घट झाली आहे.

चांदीचे भाव

चांदीच्या दरानेही गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे. बुधवारी 2 हजार, गुरुवारी 1 हजार आणि शुक्रवारी पुन्हा 2 हजारांची वाढ झाली. परिणामी, चांदीचा दर आता 1,03,000 प्रति किलो वर पोहोचला आहे. थोडक्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या बाजारपेठेतील बदलांमुळे सोने चांदी देखील महागले आहे.

घरबसल्या जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

अनेकजण सणासुदीच्या काळामध्ये सोन्याची खरेदी करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सोन्याचा भाव किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ताज्या किंमती जाणून घेऊ शकतात. IBJA कडून हे दर दररोज जाहीर केले जातात, मात्र शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्यांमध्ये हे दर जाहीर केले जात नाहीत.

सोन्या-चांदीच्या दरातील वाढीमागची कारणे

जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किंमतीवर परिणाम होत आहे. येत्या काळात या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या वाढत्या किंमतींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.