Gold Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| राज्यामध्ये सोन्याच्या किमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत होत्या. लग्नसराईमुळे तर मागणी वाढल्याने दर वधारले होते. मात्र, आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

सोन्याच्या किमतीत मोठी घट (Gold Price Today)

आज २१ मार्च रोजी सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४४० रुपये प्रति १० ग्रॅमची घट झाली आहे. परिणामी, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा नवा दर ९०,३७० रुपये झाला आहे. तर १०० ग्रॅम सोनं ९,०३,७०० रुपयांना मिळत आहे. हे भाव सोने खरेदी करण्यासाठी उत्तम मानले जात आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे नवे दर

१ ग्रॅम: ८,२८५ रुपये

१० ग्रॅम : ८२,८५० रुपये

१०० ग्रॅम: ८,२८,५०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचे नवे दर

१ ग्रॅम: ९,०३७ रुपये

१० ग्रॅम: ९०,३७० रुपये

१०० ग्रॅम: ९,०३,७०० रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर(Gold Price Today)

सोन्याचे दर शहरानुसार थोडेफार बदलतात. मात्र, आज मुंबई, पुणे आणि जळगावमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे समान दर आहेत.

मुंबई

२२ कॅरेट – ८,२७० रुपये प्रति ग्रॅम

२४ कॅरेट – ९,०२२ रुपये प्रति ग्रॅम

पुणे

२२ कॅरेट – ८,२७० रुपये प्रति ग्रॅम

२४ कॅरेट – ९,०२२ रुपये प्रति ग्रॅम

जळगाव

२२ कॅरेट – ८,२७० रुपये प्रति ग्रॅम

२४ कॅरेट – ९,०२२ रुपये प्रति ग्रॅम

खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?

सोन्याची किंमत (Gold Price Today)कमी झाल्याने ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. खासकरून लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस सुवर्णसंधी ठरू शकतो. मात्र, दररोज सोन्याच्या किंमती बदलत असल्याने खरेदीपूर्वी स्थानिक बाजारातील ताज्या किमती नक्की तपासा.