Gold Price Today| गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने-चांदीच्या किमतींत अखेर आज घसरण झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या चांदीच्या किमतींनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. याआधी चार दिवसांपासून दोन्ही धातूंच्या किमतींनी वेगाने उसळी घेतल्याने बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज दोन्ही धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
किंमती वाढण्यामागचे कारण काय?
जागतिक स्तरावर शांततेचा कालावधी सुरु होत असतानाही सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अचानक झालेली वाढ अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. परंतु, अमेरिका आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या आक्रमक धोरणांमुळे या धातूंच्या किमतींत वाढ झाल्याचे म्हणले जात आहे. परंतु आता सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे खरेदीचा वेग वाढला आहे.
सोन्याचा भाव 440 रुपयांनी खाली (Gold Price Today)
सोमवारी सोन्याच्या किमतीत 110 रुपयांची घट झाली होती. मात्र, मंगळवारपासून गुरुवारपर्यंत सोन्याने तब्बल 1,000 रुपयांची वाढ नोंदवली. यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांची तर गुरुवारी 220 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी मात्र, सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 2,100 रुपयांची मोठी घसरण
सोन्याच्या किंमतीसोबत चांदीतही मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, मंगळवारी 1,100 रुपयांनी आणि बुधवारी 1,000 रुपयांनी वाढ झाल्यानंतर गुरुवारी 100 रुपयांची किंमत वाढली होती. शुक्रवारी मात्र, चांदीने तब्बल 2,100 रुपयांची घसरण नोंदवली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज सध्या 1 किलो चांदीचा दर 1,03,000 रुपये आहे.
वेगवेगळ्या कॅरेट सोन्याचे नवीन दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ताज्या अहवालानुसार,
24 कॅरेट सोने: 88,169 प्रति 10 ग्रॅम
23 कॅरेट सोने: 87,816 प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: ₹80,763 प्रति 10 ग्रॅम
घरबसल्या जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
सोने-चांदीच्या ताज्या किमती (Gold Price Today)ग्राहक घरबसल्या जाणून घेऊ शकतात. स्थानिक कर व अन्य शुल्कामुळे शहरानुसार किंमती वेगळ्या असू शकतात. IBJA हे दर अधिकृतपणे जाहीर करते. सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, दररोज हे दर प्रसिद्ध केले जातात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे नवीन दर सहज समजू शकतात.