Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये दररोज चढउतार होत आहेत. परंतु आज बऱ्याच दिवसानंतर सोन्या-चांदीच्या किमती उतरले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु आज ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी योग्य संधी चालून आली आहे. आज म्हणजे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती (Gold Price Today) उतरल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,850 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,840 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,040 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,040 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करणे ग्राहकांना परवडू शकते.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव(Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,850 रुपये
मुंबई – 54,850 रुपये
नागपूर – 54,850 रूपये
24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 59,840 रूपये
मुंबई – 59,840 रूपये
नागपूर – 59,840 रुपये
चांदीचे आजचे भाव
आज सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी चांदीच्या किमतीमध्ये किंचित वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 755 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 75,500 रुपये भावाने विकली जात आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चांदीपेक्षा सोने खरेदी करण्यास जास्त ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते.
प्लॅटिनम किंमती
शुक्रवारी चांदीसोबत प्लॅटिनमच्या किमती देखील वाढल्या आहेत. आजच्या दिवशी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24 हजार 640 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,46,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्लॅटिनम खरेदी शक्यतो ग्राहकांनी टाळावेच. मुख्य म्हणजे, पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या किमतींमध्ये असेच चढउतार पाहायला मिळतील असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.