Gold Price Today : आज ५ फेब्रुवारी २०२३ ला सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात प्रतितोळा २५० ते ३०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी हा योग्य असा काळ म्हंटल जाईल. दिल्ली, चेन्नई, मुंबईसारख्या देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर घसरल्याने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो 76,500 रुपये आहे.
Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत ५७,९५० रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव ६३,२२० रूपयांनी सुरू आहे. तर बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) प्रति १० ग्रॅम ५७,१६३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,३६० प्रति १० ग्रॅम आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,950 रुपये
मुंबई – 57,950 रुपये
नागपूर – 57,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,220 रूपये
मुंबई – 63,220 रूपये
नागपूर – 63,220 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.