Gold Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदी किंचित नरमली; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आजपासून व्हॅलेंटाईन डे वीक सुरू झाला आहे. आज या वीकमधला पहिला डे रोज डे आहे. त्यामुळे तरुण जास्त प्रमाणात गुलाब घेण्यास उत्सुक आहेत. यात अनेकजण आपल्या जोडीदारासाठी सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट अशा गोष्टी खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. मात्र अशा काळातच सोन्या-चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. आज सोन्याच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आज कोणताही दागिना खरेदी करण्यापूर्वी आजचे भाव तपासून घ्या.

बुधवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,230 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,230 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,000 रुपये
मुंबई – 58,000 रुपये
नागपूर – 58,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,230 रूपये
मुंबई – 63,230 रूपये
नागपूर – 63,230 रूपये

Gold Price Today

चांदीचे भाव

आज चांदीच्या भावामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. बुधवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 74,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आज ग्राहक चांदीची खरेदी करू शकतात.