Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली घसरण; नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय बाजारात सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. बुधवारी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.18% घसरत 47,548 वर आला, तर चांदीचा वायदा दर 0.60% खाली घसरून 71,500 रुपये प्रति किलो झाला. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांच्या विक्रमाची पातळी गाठली. त्यानुसार सोने त्यानंतर 9000 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

सोन्याच्या नवीन किंमती : बुधवारी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा 0.18% ने कमी होऊन 47,548 वर प्रति 10 ग्रॅम झाला. मंगळवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,640 च्या पातळीवर बंद झाले होते.

चांदीच्या नवीन किंमती : चांदीच्या किंमतींमध्ये आज घसरणीची नोंद झाली आहे. चांदीचा वायदा 0.60% ने कमी होऊन 71,500 रुपये प्रतिकिलोवर आला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, स्पॉट सोन्याचे औंस 0.2 टक्क्यांनी घटून 1,832.73 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकन सोन्याचे वायदा 0.1 टक्क्यांनी घसरून 1,834.30 डॉलरवर बंद झाले. चांदी 0.6 टक्क्यांनी घसरून 27.47 डॉलर प्रति औंसवर, तर प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी घसरून 1,228.68 डॉलरवर बंद झाला.

स्वत: सोन्याची शुद्धता तपासा
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी शासनाने अ‍ॅप तयार केला आहे. ”BIS Care app” सह ग्राहक सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासू शकतो. या अ‍ॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंबंधात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅप (App) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment