Gold Price Today | सोन्याचे भाव भिडले गगनाला; जाणून घ्या काय आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या महामारीचा उद्रेक होण्याबरोबरच अमेरिकेच्या चीनबरोबरील व्यापार कराराच्या तणावामुळे सोन्याची झळाळी पुन्हा एकदा वाढलेली दिसून येते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या जोरदार संकेतांमुळे भारतीय फ्युचर्स मार्केट एमसीएक्सवर सोन्याची किंमतीने सोमवारी पुन्हा उचल घेतली आहे. देशांतर्गत वायदे बाजारामध्ये सलग चौथ्या हंगामात सोन्याच्या किंमती वाढतच राहिल्या. सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीही वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सोन्याची किंमत पोहोचली विक्रमी उच्चांकावर
जूनच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये सोन्याचा भाव हा मागील सत्राच्या तुलनेत ३६ रुपयांनी वाढून ४७७४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता, तर आत्ता सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४७७७० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर, एमसीएक्सवरील चांदीचा भाव हा मागील सत्राच्या तुलनेत १४२२ रुपये किंवा ३.०४ टक्क्यांनी वाढून ४८१४० रुपये प्रतिकिलो राहिला.

तज्ज्ञांचे मत
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे सध्या जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात आहे, तर अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव वाढत आहे, ज्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेक्सवर सोन्याची किंमत सात वर्षांहून अधिक काळ उच्च पातळीवर राहिली आहे. या कोरोनाच्या कालावधीत शेअर बाजारावर होणाऱ्या परिणामांमुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हला आर्थिक पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुस्त होण्याची भीती होती. कॉमेक्सवरील सोन्याचा जूनचा करार हा मागील सत्राच्या तुलनेत १२.८० डॉलर किंवा ०.७३ टक्क्यांनी वधारून १७६९.१० डॉलर प्रति औंसवर होता. त्याचबरोबर चांदीचा जुलैच्या करार हा मागील सत्राच्या तुलनेत २.९८ टक्क्यांनी वधारून १७.९७ डॉलर प्रतिऔंस औंसवर होता.

अँजेल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की सोने हे संकटांतील भागीदार असल्याने यावेळी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचे पसंतीचे साधन बनलेले आहे. ते म्हणाले की जेव्हा लोकं संकटात असतात, तेव्हा त्यांच्याकडे असलेली रोकडच त्यांना मदत करते किंवा लोकांकडे असलेलं सोने हे अडचणीच्या काळात धन वाढवायला मदत करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment